नमो शेतकरी महासन्मान निधी योजना . Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचा चालू वर्षाचा अर्थ संकल्प मांडताना केली.
![]() |
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना . Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana
काय आहे योजना :- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत जे
राज्यातील शेतकरी केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते घेत
आहेत त्यांना राज्य सरकार कडून नमो शेतकरी या योजनेंतर्गत वर्षासाठी ६,००० रु मदत
म्हणून दिली जाणार आहे.'
या अगोदर केंद्र सरकार शेतकर्याना वर्षासाठी ६,०००रु मदत देत
आहे त्याच बरोबर आता केंद्र व राज्य यांचे मिळून एकूण १२,००० रु दिले जाणार आहेत.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत तेच शेतकरी पात्र असतील
जे शेतकरी पी एम किसान निधी योजने साठी पात्र असतील.
पी एम किसान निधी योजनेच्या च पार्श्वभूमीवर या नमो शेतकरी
योजनेची सुरवात करण्यात आली आहे."
![]() |
Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana |
पात्रता व अटी :- पी एम किसान निधी योजेचा लाभार्थी असेलेले
सर्व शेतकरी या नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
तसेच शेतकर्यांनी आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे
गरजेचे आहे.
पी एम किसान योजनेंतर्गत जी ई केवायसी आहे ती करणे गरजेचे
आहे.
महा भूमिलेख पोर्टल
वरती आपली माहिती अद्यावत करणे गरजेचे आहे.
कधी येणार पैसे :- मित्रांनो या नमो शेतकरी योजनेचे पैसे
कधी येणार असे वारंवार विचारले जात होते तर या योजनेचा पहिला हप्ता व पी एम किसान
योजनेचा १४ वा हप्ता हा मे महिन्यामध्ये राज्य सरकारचे २,००० रु व केंद्र सरकारचे २,००० रु असे एकूण ४,००० रु मे महिन्यामध्ये
शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
0 Comments
हि कोणत्याही योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यांगतांना संबधित योजनेची माहिती किंवा तक्रार संबधित संकेतस्थळावर जावून एकदा तपासून पहावी किंवा संबधित अधिकाऱ्यांना भेट देवून तपासून पहावी.
धन्यवाद.