इलेक्ट्रिक मोटार अनुदान योजना Electric Motar Anudan Yojana 2023

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शेतकर्यांसाठी महा डी बी टी अंतर्गत विविध योजना राबविल्या जातात, या योजनांपैकी च एक म्हणजे इलेक्ट्रिक मोटार अनुदान योजना आहे.


इलेक्ट्रिक मोटार अनुदान योजना Electric Motar Anudan Yojana 2023

काय आहे योजना :-

                        महाराष्ट्रातील शेती समृद्ध व्हावी व शेतकर्यांना त्याचा अर्थीक फायदा व्हावा या अनुषंगाने महा डी बी अंतर्गत सिंचन साधने व सुविधा या घटकामध्ये इलेक्ट्रिक मोटार अनुदान योजना राबवली जाते.

Electric Motar Anudan Yojana 2023
Electric Motar Anudan Yojana 2023



मित्रांनो , या योजनेत शेतकर्यांना इलेक्ट्रिक मोटार घेण्यासाठी अनुदान दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरवातीला महा डी बी टी शेतकरी या पोर्टल वरती जावून ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्ज केल्यानंतर शेतकर्यांकडून  फक्त २३.६० रु शुल्क आकारले जाते या व्यतिरिक्त इतर कोणतेही पैसे घेतले जात नाहीत त्यानंतर काही दिवसांनी लॉटरी लागते जर शेतकर्याची निवड झाली तर या योजनेचा लाभ घेता येतो.

सर्व प्रक्रिया हि संगणीकृत असल्यामुळे या मध्ये कोणाचा हि हस्तक्षेप नसतो, त्यामुळे कोणाची निवड कधी होईल हे सांगता येत नाही.

ऑनलाईन फोर्म भरून जेव्हा निवड होते तेव्हा शेतकर्याला मेसेज जातो व कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सांगितले जाते.

अर्जदाराचे आधार कार्ड, बँक पासबुक, ७/१२ उतारा, ८ अ हि कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

इलेक्ट्रिक मोटार अनुदान योजना Electric Motar Anudan Yojana 2023

त्यानंतर  शेतकर्यांना पूर्वसंमती  दिली जाते म्हणजे एक परवानगी दिले जाते.

पूर्व संमती दिल्या नंतर शेतकर्यांनी मोटार घ्यावी लागेल परंतु हि मोटार  ४ किंवा ५स्टार रेटिंग व आयएस आय मार्क असलेली पाहिजे तरच अनुदानाचा फायदा दिला जातो.

ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा

 https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

 

हि मोटार स्वखर्चाने घ्यावी लागते त्यानंतर मोटार चे जे जी एस टी बिल, टेस्ट रिपोर्ट असेल ते वेबसाईट वर अपलोड करावे लागेल त्या नंतर शेतकर्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

अनुदान किती :- या योजनेत जय जास्तीत जास्त १० एच पी ची मोटार घेतली तर १०,००० रु अनुदान दिले जाते .

१० एच पी पेक्षा मोठी मोटार मोटार घेतली तर प्रती एच पी १,५०० रु अनुदान दिले जाते.