नाविन्यपूर्ण गायी व म्हशी वाटप योजना Navinyapurn Gayi , Mhshi Vatap Yojana 2023
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून
चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी नाविन्यपूर्ण गायी व म्हशी वाटप योजनेची
अंमलबजावणी बजावणी करण्यासाठी शासन निर्णय जाहीर केला आहे.
Navinyapurn Gayi , Mhshi Vatap Yojana 2023
काय आहे योजना :- राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतगणत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत
गायी / 02 म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे.
Navinyapurn Gayi , Mhshi Vatap Yojana
दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत
दुधाल योजनेत वाटप करावयाच्या प्रती गाईची किंमत ७०,००० -/ रु व प्रती म्हशीची किंमत
८०,००० -/ रु केली आहे.
हि योजना राज्यात चालू २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राबवली जाणार आहे.
या योजनेंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण लाभार्थ्यांना ०२
देशी / ०२ संकरीत / ०२ म्हशींचा गट वाटप करण्यासाठी ५० % अनुदान दिले जाणार आहे.
तसेच अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजने
अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ % अनुदान दिले जाणार आहे.
गायी किंवा म्हशी खरेदी करताना अनुदानाव्यतिरिक्त जी रक्कम
लागणार आहे ती रक्कम लाभार्थाना स्वतः उभी करावी लागेल.
नाविन्यपूर्ण गायी व म्हशी वाटप योजना Navinyapurn Gayi , Mhshi Vatap Yojana 2023
लाभार्थी निवडीचे निकष :-
सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवसी क्षेत्र लाभार्थ्यांची निवड खालील प्रधाण्याक्रमावरून
केली जाणार आहे.
महिला बचत गटातील लाभार्थी
अल्प भूधारक शेतकरी ( १ ते २ हेक्टर पर्यंत )
सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयरोजगार केंद्रात नोंद
असलेले )
अटी व शर्ती :- या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतिने अर्ज
मागविले जाणार आहेत.
या योजनेची संपूर्ण माहिती खालील वेबसाईट वर उपलब्ध करून
दिली जाणार आहे.
या योजनेच लाभघेण्यासाठी गुगल प्ले स्टोर वरून AH-MAHABMS या App मधून अर्ज करावा लागेल.
लाभार्थायची निवड करताना ३० %
महिला लाभार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे व ३ % विकलांग लाभार्थ्यांना
प्राधान्य दिले जाणार आहे.
अश्या प्रकाची या योजनेची संपूर्ण
प्रक्रिया असून जास्तीत जास्त शेतकर्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आहे.
0 Comments
हि कोणत्याही योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यांगतांना संबधित योजनेची माहिती किंवा तक्रार संबधित संकेतस्थळावर जावून एकदा तपासून पहावी किंवा संबधित अधिकाऱ्यांना भेट देवून तपासून पहावी.
धन्यवाद.