कडबा कुटी अनुदान योजना Kadaba Kuti Anudaan Yoajana
नमस्कार मित्रांनो,
आपल्या महारष्ट्र राज्यात दुध उत्पादनास चालना मिळावी या अनुषंगाने राज्य शासनाने
कडबा कुटी अनुदान योजना चालू केली आहे. या योजनेत शेतकर्यांना कडबा कुटी घेण्यासाठी
अनुदान किंवा अर्थसहाय्य केले जाते.
कडबा कुटी अनुदान योजना Kadaba Kuti Anudaan Yoajana
काय आहे योजना :- मित्रांनो हि
योजने राज्य सरकारने शेतकर्यांसाठी दुध
उत्पादनास चालना देण्यासाठी या योजेची सुरवात करण्यात आली आहे. या योजनेमध्ये कडबा
कुटी घेण्यासाठी अनुदान दिले जाते.
या योजनेत शेतकर्यांनी स्वतः कडबा
कुटी घ्यावी लागते व त्या नंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अनुदान
शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
कडबा कुटी अनुदान योजना Kadaba Kuti Anudaan Yoajana
![]() |
Kadaba Kuti Anudaan Yoajana |
योजनेचा लाभ कसा घ्यावा :- ज्या
शेतकर्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सुरवातील ऑनलाईन पद्धतिने अर्ज
करावा लागेल त्यासाठी महा डी बी टी शेतकरी पोर्टल या वेबसाईट वरून अर्ज करावा
लागेल.
अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी
लॉटरी लागते जर त्यामध्ये निवड झाली तर या योजनेचा लाभ घेता येतो. 'Kadaba Kuti Anudaan Yoajana'
निवड झाल्यानंतर सुरवातील
कागदपत्रे अपलोड करावी लागतील त्यामध्ये ७/१२ उतारा, ८ अ , कडबा कुटी कोटेशन,
टेस्ट रिपोर्ट हि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर थोड्या
दिवसात पूर्वसंमती दिली जाते व त्यानंतर कडबा कुटी ची खरेदी करून त्याचे जे जी एस
टी बिल असेल ते अपलोड करावे लागेल.
हि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कृषी विभागाचे जे कोणी अधिकारी असतील ते स्वतः भेट देवून कडबा कुटी ची पाहणी करतील व तुमचा अर्ज मंजूर करतील."Kadaba Kuti Anudaan Yoajana"
हि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण
झाल्यानंतर अनुदानाची जी रक्कम असेल ती शेतकर्याच्या खात्यात जमा केली जायील.
ऑनलाईन अर्ज करण्यासठी खालील लिंक वरती क्लिक करा :-
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
अनुदान किती :- या योजनेमध्ये
सर्वसाधारण लाभार्थी असेल तर १०,००० रु पर्यंत अनुदान दिले जाते.
तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गातील
लाभार्थी असेल तर २०,००० रु पर्यत अनुदान दिले जाते.
टीप :- वरील अनुदानात थोडी कमी
किंवा जास्त होवू शकते, अनुदानाची रक्कम हि पूर्वसंमती वरती दिलेली असते.
आवश्यक कागदपत्रे :- आधार कार्ड ,
बँक पासबुक, ७/१२ उतारा, ८ अ, कडबा कुटी कोटेशन, कडबा कुटी टेस्ट रिपोर्ट, कडबा
कुटी जी एस टी बिल
वरील योजनेचा फायदा भरपूर
शेतकर्यांनी घ्यावा या अनुसंगाने वरील माहिती दिलेली आहे तर वरील माहिती चा वापर
करून जास्तीत जास्त शेतकर्यांनी योजनेचा फायदा घ्या हे जाहीर आवाहन.
0 Comments
हि कोणत्याही योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यासारखी वयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही . आम्ही आमच्या सर्व अभ्यांगतांना संबधित योजनेची माहिती किंवा तक्रार संबधित संकेतस्थळावर जावून एकदा तपासून पहावी किंवा संबधित अधिकाऱ्यांना भेट देवून तपासून पहावी.
धन्यवाद.